गडचिरोली : विद्युत कर्मचाऱ्याचा करंट लागून मृत्यू

2135

– विद्युत खांबावर चढून काम करतांना लागला करंट
The गडविश्व
गडचिरोली, १९ जून : तालुक्यातील येवली परिसरातील दर्शनी माल येथे विद्युत खांबावर चढून काम करत असतांना करंट लागल्याने विद्युत कर्मचाऱ्याचा खांबावरच मृत्यू झाल्याची घटना सोमवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली. वैभव जेंगठे (२२) असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, विद्युत कर्मचारी जेंगठे हा सकाळच्या सुमारास दर्शनी माल येथे वीज दुरुस्ती करण्याकरिता विद्युत खांबावर चढला. दुरुस्तीचे काम करतांना अचानक जेंगठे ला जोरदार विजेचा धक्का बसल्याने त्याचा खांबावरच मृत्यू झाला. विद्युत खांबावर चढला तेव्हा वीज नव्हती अचानक वीज आल्याने सदर घटना घडल्याचे बोलल्या जात आहे. मात्र थोड्याश्या चुकीने विद्युत कर्मचारी वैभव जेंगठे ला आपला जीव गमवावा लागला. मृतक जेंगठे हा ब्रम्हपुरी तालुक्यातील मंगरमेंढा येथील रहिवासी असल्याचे कळते. तर तो येवली परिसरात तत्परतेने काम करणारा कर्मचारी म्हणून परिचीत होता. त्याच्या अश्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून जेंगठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli news updates)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here