घरगूती दारुसह विक्रीवरही गावाने घातली बंदी

161

– मेडपल्ली गावाने घातला पायंडा
The गडविश्व
गडचिरोली, १२ एप्रिल : अहेरी तालुक्यातील मेडपल्ली गाव संघटनेने अथक परिश्रम घेऊन सलग पाच वर्षांपासून गावाला दारूविक्रीमुक्त ठेवले आहे. एवढेच नव्हे तर घरगुती दारू काढण्यावरही बंदी घातली आहे.
मेडपल्ली मुक्तिपथ गाव संघटनेने आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण केली आहे. गावातील कार्यकर्ते सक्रिय असून मागील पाच वर्षापासून मुक्तीपथच्या मार्गदर्शनाखाली गावाची दारू विक्री बंद केली आहे. तसेच दारू विक्रेते डोके वर काढताच त्यांना वेळीच लगाम घालून दंड आकारून विक्री बंद करण्यात आली आहे. दारू विक्री करणाऱ्यांवर १५ हजार रुपये दंड असून पकडून देणाऱ्यास १ हजार रुपये बक्षीस ग्रामसभेने ठरविलेल असून हा निर्णय गावसंघटना व ग्रामस्थांनी घेतला आहे.
सक्रिय गाव संघटना व ग्रामस्थांच्या पुढाकारातून गावातील अवैध दारूविक्री सलग पाच वर्षांपासून बंद आहे. सोबतच घरगुती दारू काढण्यावरही गावाने बंदी घातली आहे. खर्रा विक्री करिता सुद्धा गावात बंदी घालता येईल का ? यासाठी गावकऱ्यानी प्रयत्न सुरु केले आहे. यासाठी सरपंच निलेश वेलादी व भगवान मडावी यांच्यासह गाव संघटनेच्या इतर सदस्यांचे मोलाचे योगदान आहे. या गावाचा आदर्श इतर आदिवासी गावांनी घेऊन, आपल्या गावात सुद्धा घरगुती किंवा कुणी विक्री करत असल्यास बंद करावी व पुढील पिढी करिता आदर्श घडवावा असा पायंडा मेडपल्ली गावाने घातला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here