– दोन दिवसांपासून होता बेपत्ता
The गडविश्व
गडचिरोली, १२ एप्रिल : जिल्हा मुख्यालयालागत असलेल्या इंदाळा येथील साहिल जेंगठे (१९) हा दोन दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाला होता दरम्यान दोन दिवसांच्या शोधा नंतर बुधवार १२ एप्रिल रोजी त्याचा मृतदेहच वैनगंगा नदी काठावर आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, इंदाळा येथील साहिल जेंगठे (१९) हा मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होता. सर्वत्र शोध घेऊन कुठेही आढळून आला नाही अखेर याबाबत मंगळवार ११ एप्रिल रोजी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. बुधवार १२ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास वैनगंगा नदी काठावर साहिलचा मृतदेहच नागरिकांना आढळून आला. साहिलच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. घटनेबाबत गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
(The gadvishva) (the gdv) (vainganaga river) (indala sahil jengthe)