अबब…हिरो शोमरूमध्ये आग, वाहनांसह साहित्यांची राख रांगोळी

225

– करोडोंचे झाले नुकसान
The गडविश्व
चंद्रपूर, १२ एप्रिल : जिल्ह्यातील कोरपना येथील आदर्श दुचाकी वाहनांच्या हिरो शोरूमला बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची माहिती पुढे येत असून यात दुचाकी वाहनांसह संपूर्ण शोरूममधील साहित्यांची राख रांगोळी झाल्याचे कळते.
बुधवारी मध्यरात्री चंद्रपूर मार्गावर असलेल्या कोरपना येथील हिरो शोरूमला आग लागली या भीषण आगीत शोरूम मधील नव्या कोऱ्या गाड्या, टू व्हीलरचे ॲक्सेसरीज, शोरूमची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, संगणक आदी साहित्य पूर्णत: जळून खाक झाले. त्यामुळे शोरूमचे करोडोंचे नुकसान झाले आहे. हे शोरुम कोरपना येथील सुहेल आबिद अली यांच्या मालकीचे आहे असेही कळत असून ही आग शॉर्टसर्किट की नेमकी अन्य कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झाले नाही. दरम्यान घटनास्थळी अग्निशामक दल पथक पोहचून आग विझवण्यात यश आले आहे.

(The gdv) (the gadvishva) (chandrpur) (hero shorum korpana)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here