गडचिरोली : अंगणात खेळत होता चिमुकला, मोकाट कुत्र्याने हल्ला करुन केले गंभीर जखमी

1300

– घटनेने नागरिक भयभीत
The गडविश्व
गडचिरोली, १२ एप्रिल : घराच्या अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळच्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील कारसपल्ली (नारायणपूर) येथे घडली. रियांश राजेंद्र कडकरी
(१) असे जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, कारसपल्ली येथील रियांशची आई त्याला घरातील अंगणात खेळण्याकरिता सोमवारला सकाळच्या सुमारास सोडून स्वयंपाक करण्याकरिता घरात गेली. दरम्यान मोकाट कुत्र्याने रियांशवर हल्ला करून त्याच्या तोंडाला धरले. यावेळी रियांशने आरडाओरड केल्याने त्याची आई व घरानजीकच्या नागरिकांनी धाव घेत कुत्र्याच्या तावडीतुन रियांशला सोडविले. मात्र यात रियांश गंभीर जखमी झाला. लागलीच त्याला उपचारासाठी सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला तेलंगणा राज्यातील मंचेरियाल येथे रेफर करण्यात आल्याचे कळते. तर कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी होण्याची ही तिसरी घटना असल्याचे बोलल्या जात असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे तर सदर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

(The gdv) (the gadvishva) (gadchiroli news )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here