जबरी चोरी करणाऱ्या आरोपींच्या आरमोरी पोलीसांनी आवळल्या मुसक्या

1385

– सेवानिवृत्त वृध्द परिचारिकेच्या घरात घुसुन केली जबरी चोरी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : सेवानिवृत्त वृध्द परिचारिकेच्या घरात घुसुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपींच्या आरमोरी पोलिसांनी मुसक्या अवळल्या आहेत. आरोपींमध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह इतर तिघांचा समावेश आहे.
अंकित भिमराव लटारे ( वय २४ ) रा. ठाणेगाव, प्रशांत विलास राऊत (वय २२) रा. रामाळा, प्रतिक राजु भुरसे (वय २३) रा. ठाणेगाव व एक विधीसंघर्षग्रस्त बालक रा. ठाणेगाव असे आरोपींची नावे आहेत.
आरमोरी तालुका मुख्यालयापासून ०३ कि.मी. अंतरावर असलेले ठाणेगाव (नवीन) येथे राहणा­ऱ्या सेवानिवृत्त परिचारीकेच्या घरात २९ जुलै २०२४ रोजी रात्रो 10.45 ते 12.30 वा. सुमारास ०३ अज्ञात चोरटयांनी प्रवेश करुन त्यांचे हातपाय खुर्चीला बांधुन त्यांच्या घरातील कपाटामध्ये, ड्रेसींग टेबल येथे ठेवलेले व त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच हातात असलेली सोनाटा कंपनीची वॉच असा एकुण ३ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला आहे अशी तोंडी रिपोर्ट आरमोरी पोलीस ठाण्यात दाखल केली असता 209/2024 कलम 309(4), 306(क), 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवुन तंत्रशुध्द पध्दतीने करुन सदर गुन्हयातील अज्ञात चोरटयाचा शोध घेत मुसक्या आवळल्या. गुन्हयातील तिन्ही अटक आरोपितांना न्यायालयासमोर हजर केले असता यायालयाकडुन सदर आरोपितांना १२ ऑगस्ट २०२४ पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. विधीसंघर्षग्रस्त बालक वय 17 वर्ष 06 महिने रा. ठाणेगाव यास ताब्यात घेवुन त्याला बालसुधारगृहात रवाना करण्यात आले. अटक आरोपितांकडे गन्हयाच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता आरोपी अंकित भिमराव लटारे हा सदर गुन्हयाचा प्रमुख सुत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्हयातील मुद्देमाल छत्तीसगड राज्यातील भिलाई येथे लपवुन ठेवला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर मुद्देमाल आरोपिंताकडुन हस्तगत करण्यात आला. तसेच अटक आरोपितांचा यापुर्वी सुध्दा अशाच प्रकारच्या आणखी कोणकोणत्या गुन्हयात सहभाग होता याबाबत पोलीस दलाकडुन कसुन शोध घेण्यात येत आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे आरमोरीचे पोउपनि विजय चलाख हे करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. उल्हास भुसारी, पोस्टे आरमोरीचे प्रभारी अधिकारी पोनि. विनोद रहागंडाले, स्थानिक गुन्हे शाखेचे व पोस्टे आरमोरी अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली आहे.

(#thegdv #thegadvishva #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #crimenews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here