कुरखेडा : गावामध्ये चिखलमय रस्ते, नागरिकांनी रोवणी करून वेधले लक्ष

1006

– जिल्हाभरात चर्चा
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडाझ दि. ०८ : गावामध्ये चिखलमय स्त्याने त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी चिखलमय रस्त्यावर रोवणी करून प्रशासनाचा निषेध नोंदवत लक्ष वेधले आहे. सदर प्रकार तालुक्यातील हेटीनगर येथील असून याबाबतचा व्हिडियो समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमतांनाही दिसत आहे. गावकऱ्यांनी केलेल्या या निषेधाची जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात चर्चाही होतांना दिसत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले तर अनेक मुख्य रस्त्यांची चाळणही झाली आहे. दरम्यान कुरखेडा तालुक्यातील हेटीनगर गावातील रस्ते सततधार पावसामुळे चिखलमय झाले आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असल्याने नाहक त्यास सहन करावे लागत आहे. वारंवार सूचना करूनही ग्रामपंचायत काहीच उपाययोजना करत नसल्याने अखेर गावकऱ्यांनी आज ८ ऑगस्ट रोजी गावातील मुख्य चौकातील चिखलमय रस्त्यावर चक्का रेड्याने नागर- फण घेवून चिखल सपाट करत धानाची रोवणी केली. गावकऱ्यांनी केलेल्या या अनोख्या आंदोलनाची मोठ्याप्रमाणत जिल्हाभरात चर्चा सुरू असून नागरिकांनी जरी आज निषेध नोंदविला असला तरी ही समस्या लवकरात लवकर मार्गी लागली नाही तर मोठा आंदोलन करण्याचा इशाराही दिलेला आहे. या अनोख्या आंदोलनाचे व्हिडियो समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाले असून विविध प्रतिक्रियाही उमटताना दिसून येत आहे.

(#thegdv #thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here