नक्षली असल्याचे भासवून खंडणी मागणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या

215

– दोघांना अटक, चार आरोपी फरार
The गडविश्व
गडचिरोली, १४ जानेवारी : नक्षली असल्याचे भासवून कंत्राटदाराला लाखो रूपयांची खंडणी मागणाऱ्यांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहे. याप्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे तर उर्वरीत चार आरोपी फरार आहेत. नितेश मटटामी (२६), गणू नरोटे (४२) दोघेही राहणार माडेआमगाव ता. चामोर्शी जि.गडचिरोली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
धानोरा तालुक्यातील पेंढरी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येणाऱ्या सावंगा गावानजीक पुलाचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान ९ जानेवारी रोजी ६ अनोळखी व्यक्तीनंी बांधकामस्थळी जावून मजुरांनार मारहान करत त्यांच्याजवळील मोबाईल हिसकावून घेत ६० लाखांची मागणी केली व केलेल्या पैशाची मागणी पुर्ण न केल्यास वाहनांची जाळपोळ करून कंत्राटदाराला ठार करू अशी धमकी दिली. याप्रकरणी कंत्राटदाराने गावकऱ्यांना घडलेला प्रकार सांगीतला व संशय आल्याने गावकऱ्यांनी सापळा रचून १२ जानेवारीला आरोपींना खंडणीचे पैसे घेण्यास बोलावून पकडून दोघांना पोलीसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पोलीसांनी आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर विविध गुन्ह दाखल करून फरार आरोपींचा शोध मोहीम राबविली आहे. फरार आरोपीमंध्ये बंडू हिचामी रा.एटापल्ली, प्रदिप उसेंडी रा. सावंगी तसेच गडचिरेाली येथील पदा नामक दोघा व्यक्तींचा समावेश असल्याचे कळते. सदर घटनेने परिसरात मात्र खळबळ उडाली आहे.
सदर घटनेतील अटकेतील आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती आहे.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (Napoli vs Juventus) (Aston Villa vs Leeds United) (Pakistan vs New Zealand) (Hockey World Cup 2023) (Elvis Presley)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here