-अतिदुर्गम आलदंडी झाली दारूविक्रीमुक्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : अतिदुर्गम एटापल्ली तालुक्यात वसलेल्या आलदंडी गावातील लोकांकडे रोजगारातून पैसे येताच गावात विदेशी दारूची विक्री सुरु झाली. परिणामी लोकांना विदेशी दारूची चटक लागली होती. त्यामुळे रोजगारातून मिळालेला संपूर्ण पैसा दारूवरच खर्च होऊ लागला. ही गंभीर बाब लक्षात येताच पोलीस पाटील महेश मटामी यांच्या पुढाकारातून मुक्तीपथ गाव संघटन सदस्य, गाव भूमया, गावातील आशा वर्कर, बचत सदस्य, अंगणवाडी सेविका, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी संयुक्त बैठक घेत अवैध विदेशी दारूविक्री करणाऱ्यांकडून ५ हजारांचा दंड वसूल करण्याचा कडक निर्णय घेत गावाला दारूविक्रीमुक्त केले. सोबतच मुक्तिपथ चमूने विविध उपक्रमाच्या माध्यमातून जागृती करीत मद्यपींना लागलेली विदेशी दारूची चटक सोडवली.
आलदंडी हे गाव एटापल्ली तालुकास्थळापासून अवघ्या १० किलो मीटर अंतरावर आहे. गावात आदिवासी जमातिचे लोक बहुसंख्यने राहत असल्याने या गावातील प्रथा, परंपरा आदिवासी समाजाचे रीतीरिवाजानुसार चालात असतात. गावाची लोकसंख्या ४५० असून विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळा , अंगणवाडी , सार्वजनिक गोटूल, पोलीस स्टेशन आहे. गावातील लोकांकडे शेती करणे, तेन्दुपता संकलन करणे, मोहफुल संकलन करणे, चारा बीज संकलन करणे, सुरजागड खाण मध्ये काम हे रोजगाराचे साधन उपलब्ध आहेत. पूर्वी गावात लग्न कार्य असले कि दारू देणे व सर्वानी पिणे हा कायमचे सवय झाली होती. गावा शेजारीरील पहाडीवर काम सुरु झाल्याने गावातील युवकांच्या हातात हातात पैसा अडका यायला लागला. तरुणाला हाताला काम मिळाला तसाच गावात विदेशी दारू विक्री सुरु झाल्याने कंपनीत काम करून मिळालेला पैसा हा दारू विक्रेत्याला जायला लागला होता.
अशातच मुक्तीपथ तर्फे गावात सघन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ही गंभीर बाब लक्षात आली. त्यानंतर गावात संपूर्ण गावाची बैठक लावण्यात आली. यावेळी मुक्तीपत गाव संघटन सदस्य, पोलीस पाटील, गाव भूमया, गावातील आशा वर्कर, बचत सदस्य, अंगणवाडी सेविका, गावातील प्रतिष्ठित नागरिक व मुक्तीपत तालुका संघटक किशोर मलेवार व गावातील १०० च्यावर नागरिक उपस्थित होते. गावातील बैठकीचा सुरुवात झाली तेव्हा गावात तरुणाला हाताला काम मिळाल पण कमावलेला पैसा अडका सर्व विदेशी दारू पिण्यात जाते. त्यामुळे गावात विदेशी दारू विक्री पूर्ण बंद करण्याचा ठरवून विक्री करणाऱ्यांकडून पाच हजार रुपये दंड आकारायचा असा निर्णय झाला. या निर्णयाची अंमलबजावणी करीत गावाला अवैध दारूविक्रीतून मुक्त करण्यात आले. गावात लग्नात बाहेरची विदेशी दारू आणायची नाही, दारूमुक्त लग्न व कार्यक्रम करून गावात शांतता अबाधित राखून ठेवायची आहे असे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )