सर्च’ रुग्णालयात ४१ रुग्णांची शस्त्रक्रिया

38

The गडविश्व
गडचिरोली, दि.०७ : धानोरा तालुक्यातील सर्च शोधग्राम येथील माँ दंतेश्वरी रुग्णालयात मुंबईचे डॉ. प्रितम पठारे (General Surgeon) यांच्या नेतृत्वात २६ ते २८ एप्रिल २०२४ दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. हायड्रोसील, हर्निया, अपेंडीक्स व शरीरावरील गाठी या प्रकारची लक्षणे असलेल्या ४१ रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आली.
गडचिरोली जिल्हातील आदिवासी व ग्रामीण भागातील रुग्णांना शस्त्रक्रियेची सुविधा मिळावी यासाठी चातगाव येथील सर्च रुग्णालयाने सर्जरी मोफत सर्जरी कॅम्पचे आयोजन केले होते. ऑपरेशन संबंधित प्रयोगशाळा तपासणी व ऑपरेशन मोफत करण्यात आले. सर्जरीसाठी कोणतेही शुल्क आकारले गेले नाही. रुग्ण व एक नातेवाईक यांना सर्जरी दरम्यान मोफत मेस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
सर्च रुग्णालयात गडचिरोली जिल्हातील आदिवासी व ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत ऑपरेशन सुविधा देण्यात येत आहे, सर्जरीसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, तरी ज्या रुग्णांना सर्जरीची आवश्यकता आहे त्यांनी सर्च रुग्णालयात येऊन ऑपरेशन पूर्व तपासणी करून घ्यावी व आपले नाव नोंदवून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolibews #muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here