चार शाळांची तालुकास्तरावर झेप

85

-मुक्तिपथचा प्रश्नमंजुषा उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली, २४ जानेवारी : जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम कळावे, यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे प्रश्नमंजुषा उपक्रम घेतला जात आहे. अहेरी तालुक्यातील देवलमरी व मोदुमडूगु या दोन केंद्राच्या क्लस्टरस्तरीय स्पर्धेतून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. एकूण आठ शाळांपैकी चार शाळांची तालुकास्तरावर निवड करण्यात आली आहे.
देवलमरी केंद्रस्तरीय स्पर्धेत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इंदारामचे ७ विद्यार्थी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इंदारामचे ३ विद्यार्थी, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा व्येंकटापुर येथील ४ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवलमरीचे ६ असे एकूण २० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. समन्वय शिक्षक म्हणून डी. बी. मारगोंवर, एच. डी. उराडे, टी.एच.फूलझेले, एस.पी. डोंगरे हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी परीक्षक लक्ष्मण कन्नाके व एस. आर. आस्वले यांनी उत्कृष्ठ परीक्षण करून प्रथम क्रमांक कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इंदाराम व द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवलमरी या शाळांना दिला आहे.
मोदुमडूगु केंद्रस्तरीय स्पर्धेत राजमाता राजकुवारबाई माध्यमिक आश्रम शाळा मोदुमडूगु-४, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मद्दीगुडम-४, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रामय्यापेठा-३, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेलगुर-३ अशा एकूण १४ विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांनी व्यसनाचे दुष्परिणाम यासंदर्भात उत्कृष्ट पोस्टर, सादरीकरण व गीत गायन केले. समन्वय शिक्षक म्हणून वी. एस. बोपानवर, एस.एन. कोंडगुरला, आर.आर.चांदेकर, वी.डी.खांडेकर उपस्थित होते. परीक्षक साई तुलसीगारी व दौलत रामटेके यांनी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून उत्कृष्ठ शाळा म्हणून राजमाता राजकुवारबाई माध्यमिक आश्रम शाळा मोदुमडूगु, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मद्दीगुडम या शाळांची निवड केली. दोन्ही केंद्रस्तरीय स्पर्धांचे आयोजन व नियोजन तालुका संघटक निलम मुळे, तालुका प्रेरक आनंदराव कुम्मरी, स्पार्क कार्यकर्ता स्वप्नील बावणे यांनी केले.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (Cricket) (Earthquake) (Shubman Gill) PSG) (IND vs NZ 3rd ODI) (Rohit Sharma)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here