आरमोरी : हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांच्या शिवसेना कार्यालयात साजरी

154

The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, २३ जानेवारी : शिवसेना तालुका आरमोरी तर्फे हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा कार्यक्रम आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांच्या निवासस्थानी शिवसेना कार्यालयात घेण्यात आला.
त्याप्रसंगी माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, माजी सरपंच आरमोरीचे ज्येष्ठ शिवसैनिक बुधाजी किरमे, आरमोरी विधानसभा संघटक राजूभाऊ अंबानी, देविदासजी काळबांडे, विलासजी दाणे, गोविंदाची कोहपरे, मोरेश्वरजी चेल्लीलवार, गणेशजी तिजारे दीपक कुकडकर, माजी महिला जिल्हाध्यक्ष हेमलता वाघाडे, कल्पनाताई तिजारे, इंदिरा वाकडे, मीनल बनसोड, विद्या मेश्राम, हरीरामजी मातेरे, लोमेश सहारे उपसरपंच डोंगरगाव, नरेंद्र भाऊ निंबेकर, रामदासजी दहीकर, सुनील बांगरे, हिरापुरे, राजूभाऊ किरमे व महेंद्र शेंडे आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here