– डिजीटल मिडीया असोसिएशनची पोलिस अधिक्षकांना निवेदनातून मागणी
The गडविश्व
चंद्रपुर, ६ एप्रिल :शहरात सुरु असलेल्या महाकाली यात्रेदरम्यान परिसरातील वृत्त संकलन करतांना पार्थशर समाचार या वृत्त वाहिणीचे पत्रकार यांना बुधवार ५ एप्रिल २०२३ रोजी सहा. पोलिस निरीक्षक मिलींद गेडाम यांनी विनाकारण मारहाण केली. या प्रकरणी सहा. पोलिस निरीक्षक मिलींद गेडाम यांना निलंबित करण्याची मागणी निवेदनातून पत्रकार संघटनेच्या वतीने पोलिस अधिक्षकांना करण्यात आली.
यावेळी चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मझहर अली, डिजिटल मीडिया एसोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोरडिया, आशिष अंबाड़े, सारंग पांडे, राजेश सोलापन, सुनील तायड़े, विजय सिद्धावार, जितेंद्र जोगड, राजू बित्तुरवार, दिनेश एकवोंकर, राजेश नायडू, हिमायु अली, होमदेव तुम्मेवार, मोरेश्वर उदोजवार, मनोहर दोतपल्ली, तुलशीराम जाम्बुलकर, गणेश अडूर, करण कंदूरी, प्रशांत रामटेके, शंकर महाकाली, धम्मशील शेंडे, गौरव पराते, सुनील गेडाम आदि पत्रकारांची उपस्थिती होती.
पार्थशर समाचार या वृत्त वाहिणीचे प्रशिक्षार्थी पत्रकार नेमन धनकर आणि सुनिल देवांगण हे यात्रेमध्ये आलेल्या भाविकांना आंघोळीची पुरेसी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली नसल्यामुळे उघड्यावर व अस्वच्छ पाण्यामध्ये आंघोळ करीत असल्याबाबत वृत्त संकलन व्हिडीओ शुटींगच्या माध्यमातून करीत होते यादरम्यान सहा. पोलिस निरीक्षक मिलिंद गेडाम यांनी त्यांची कोणतीही विचारणा न करता त्यांना मारहाण केली व महाकाली मंदिर परिसरात पोलिस विभागाने स्थापित केलेल्या चौकीमध्ये या दोन्ही पत्रकारांना घेऊन जाऊन त्याठिकाणी त्यांच्याजवळ ओळखपत्र असुन सुद्धा मारहाण केली. याची माहिती पार्थशर समाचार चे मुख्य संपादक राजेश नायडु यांना मिळाल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष या चौकीला भेट देवून सदर पत्रकार हे पार्थशर समाचार साठी वृत्त संकलन करीत होते व त्यामुळे त्यांनी व्हिडीओ शुट करणे भाग असल्यामुळे ते व्हिडीओ शुट करीत असल्याचे प्रत्यक्ष सांगीतल्यानंतर सुद्धा गेडाम यांनी पत्रकाराजवळील मोबाईल हिसकावून घेऊन व्हिडीओ डिलीट केले, पोलिसांची पत्रकारांशी केलेली वागणुक ही निंदनीय असून पत्रकारांना अपमानास्पद वागणुक देणारे पोलिस अधिकारी मिलिंद गेडाम यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलीस अधीक्षक यांना पत्रकार संघातर्फे निवेदनातून करण्यात आली..
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Game of Thrones) (Lucknow Super Giants) (Man City) (Bihar Board 10th Result 2023) (JioCinema) (Tata ipl 2023) ((Bombay High Court Recruitment for 160 Vacancies, Last date to apply is 7th April)