The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : धानोरा तालुक्यातील सर्च शोधग्राम येथील माँ दंतेश्वरी रुग्णालयात मागील १८ वर्षापासून ऑपरेशन शिबिराचे आयोजन केल्या जात आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तिपर्यंत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी अनुभवीव सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक (सर्जन) हे सर्च रुग्णालयात नियमित सर्जरी कॅम्पसाठी येत असतात. २२ व २३ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार्या सर्जरी कॅम्प साठी सातार्याचे डॉ. संजय शिवदे (जनरल सर्जन) यांच्या नेतृत्वात जनरल सर्जरी कॅम्प घेण्यात येत आहे.
हर्निया, गर्भाशयातील अंडाशयाच्या गाठी, शरीरावरील गाठी, अपेंडिक्स, मूळव्याध,भगंदर, लहान मुलांचे हर्निया ही ऑपरेशन शिबिरामध्ये करण्यात येतील.
गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी गरजू रुग्णांकरिता उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सर्च रुग्णालय ऑपरेशनची मोफत सुविधा तसेच चंद्रपुर, भंडारा, गोंदिया व इतर जिल्हातील रुग्णांना सवलतीमध्ये अत्यल्प दरात सुविधा प्रदान करीत आहे. विशेष म्हणजे १५ वर्षाखालील मुलांना कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच ऑपरेशन भरती दरम्यान रुग्ण व एक नातेवाईक यांना मोफत मेससुविधा देण्यात येत आहे. दिनांक- २० सप्टेंबर पर्यंत दवाखान्यात येऊन शिबिरासाठी नाव नोंदणी करून घ्यावे. प्रथम येणार्या रुग्णास प्राधान्य देण्यात येईल. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी शिबिराचा लाभ करून घ्यावे, असे आवाहन सर्च रुग्णालय करीत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )