अचानक पावसाचे आगमन ; वीज कोसळून महिलेचा मृत्यू

1747

– एक महिला गंभीर जखमी, उपचार सुरू
The गडविश्व
सिंदेवाही, २० सप्टेंबर : शेतात काम करत असतांना अचानक पावसाचे आगमन झाले. विजांचा कडकडात सुरू झाल्याने घरी जातांना अचानक अंगावर वीज पडल्याने एका महिलेचा मृत्यू तर दुसरी गंभीर जखमी झाल्याची घटना सिंदेवाही तालुक्यातील शिरकाडा येथे बुधवार २० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. महानंदा मोतीराम अलोणे असे मृतक महिलेचे नाव आहे तर सौ. रोषणा प्रफुल गेडाम असे जखमी महिलेचे नाव आहे. दोघेही राहणार शिरकाडा च्या आहेत.
हवामान विभागाने दोन दिवस येलो अलर्ट दिला असला तरी बुधवारी सकाळपासून काही भागात विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान शेतीचे कामही सुरू आहेत. बुधवारी शिरकाडा येथील काही महिला शेतातील निंदन काढण्याकरिता गेल्या असता वातावरणात अचानक बदल झाला आणि विजांच्या कडकडाटेसह मुसळधार पावसाचे आगमन महिला घरची वाट पकडले. दरम्यान घराकडे जात असतांनाच सौ. महानंदा मोतीराम अलोणे यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला तर सौ. रोषणा प्रफुल गेडाम घ्या गंभीर जखमी झाल्या. जखमी महिलेला तात्काळ ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून प्रकृती गंभीर असल्याचे कळते. घटनेची माहिती सिंदेवाही पोलिसांना देण्यात आली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here