रांगी क्षेत्रातील पोस्ट ऑफिसच्या खातेदारांच्या रकमेत अफरातफर ; व्याजासह मिळणार आता परत

249

– १० लाख ७६ हजार रुपयांची अफरातफर झाल्याची केली होती तक्रार
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २० सप्टेंबर : तालुक्यातील रांगी येथिल पोस्ट विभागाच्या पोस्ट मास्टर ने या परिसरातल्या पोस्ट ऑफिसच्या खातेदारांच्या विविध योजनांचे १० लाख ७६ हजार रुपयांची अफरातफर केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर २७ मार्च २०२३ ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना तक्रार केली होती. मुख्यमंत्र्याचे आदेशान्वये प्रवर डाक अधीक्षक डाकघर चंद्रपूर यांनी कार्यवाही करून एसबी,आरडी, एसएसए व आरपीएलआय, खातेदारांचे सर्व दावे कार्यालयाने मंजूर केले आहेत आणि त्यांना व्याजासहित परतावा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणात पोस्ट शाखा डाकघर रांगी चे फिरोज खा पठाण यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केलेली आहे असे पत्रान्वये प्रवर डाक अधिक्षक, चंद्रपूर यानी   कडवले असल्याचे प्रकाश गेडाम यांनी म्हटले आहे. त्यामुळे धानोरा तालुक्यातील रांगी परिसरातील  खातेदारांनी व्याजासकट आपले पैसे घ्यावे असे आवाहन प्रकाश गेडाम प्रदेश संघटन सरचिटणीस भाजपा ST मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांनी केले आहे.
प्रवर डाक अधीक्षक चंद्रपूर यांनी पाठविलेल्या  पत्रात अस नमूद केले आहे की फिरोज खा पठाण शाखा डाकपाल रांगी, लेखा डाकघर धानोरा येथे २४ नोव्हेंबर १९९३ पासून कार्यरत होते. यांच्या विरोधात विभागीय चौकशीमध्ये असे निष्पन्न झाले की फिरोज खा पठाण यांनी शाखा डाकपाल रांगी शाखा कार्यरत असताना रांगी गावातील व परिसरातील नागरिकांच्या एकूण ५८ एसबी, आरडी,एसएसए,आणि आरपीएल आय, खात्यामध्ये एकूण १० लाख ७६ हजार ७ रुपयाचा गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे या ५८ खातेधारकांचे सर्व दावे कार्यालयाने मंजूर केले असून त्यांना व्याजासहित परतावा देण्यात येत आहे. परिसरातील लोकांनी केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या पोस्ट आँफिसवर विश्वास ठेवून दोन पैसे वाचवून मागे ठेवून भविष्यात उपयोगी पडेल अशा उद्देशाने बचत केली होती. या परिसरातील सर्व खातेदारांनी आपले पैसे व्याजासकट घ्यावे. काही अडचण आली तर माझ्याकडे तशी तक्रार करावी असे आवाहनही प्रकाश गेडाम यांनी केले आहे. जनतेची तक्रार मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवल्यानंतर तातडीने मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन रांगी परिसरातील नागरिकांना न्याय मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे भाजपा अनुसूची जमाती मोर्चेच्या वतीने प्रदेश संघटन सरचिटणीस प्रकाश गेडाम यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here