गुणवत्ता पूर्ण काम करा, गुणवत्तेशी तडजोड केली तर अभियंता विरोधात फौजदारी सह एट्रॉसिटी गुन्हा दाखल करू

104

– मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे निर्देश
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने) २० सप्टेंबर : तालुक्यात होऊ घातलेल्या कामांना गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करा, बांधकाम करताना कुठल्याही प्रकारची गुणवत्तेशी तडजोड केली तर त्या कामाशी संबंधित अधिकारी व अभियंतावर फौजदारीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू असा इशारा येथे आयोजित आढावा सभेमध्ये बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा आश्रम यांनी दिला.
जोड रस्ते विकासाकरिता महाराष्ट्र शासनाने आदिवासी उपयोजनेतून ५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून संपूर्ण जिल्ह्यातील जोड रस्ते हे गुणवत्तापूर्ण विकसित करणे हे संबंधीत यंत्रणेची जबाबदारी असून यामध्ये कुठल्याही प्रकारची हय गय केल्यास सर्वस्वी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल असे खडे बोल मंत्री आमदार यांनी सुनावले.
उपविभागीय अधिकारी कार्यालय कुरखेडा येथील सभागृहात आयोजित आढावा बैठकीमध्ये विविध विभागाच्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांना महसूल विभागाकडून अपात्रतेसंदर्भात मिळालेल्या नोटीसवरही यावेळी चर्चा झाली. दहा ते बारा हप्ते प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना आता हप्ते परत करण्यासंदर्भात परत मिळालेल्या नोटीसीने शेतकरी त्रस्त झालेले आहेत हा विषय या ठिकाणी मंत्री आत्राम यांच्यासमोर मांडण्यात आला. संबंधित अपात्रतेबाबत शहानिशा करून झालेली चूक दुरुस्त करण्याची सूचना यावेळेस संबंधितांना देण्यात आले.
विद्युत विभागाच्या आढावा बैठकीचा विषय सुरू असताना विद्युत पुरवठा खंडित झाल्याने मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. तालुक्यातील १३२ केवी विद्युत पुरवठ्यासंदर्भामध्ये निधीचा विषय असल्याने त्याला मंत्रालय स्तरावर तात्काळ निकाली काढण्याचे काम केले जाईल अशी आश्वासन यावेळी देण्यात आले. लघु पाटबंधारे विभागाच्या आढावा मध्ये तालुक्यात सूक्ष्म सिंचनाच्या सोयी प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याची ही सूचना विभागांना करण्यात आली. येंगलखेडा येथे बांधकाम पूर्ण झालेल्या लघु बंधाऱ्यासंदर्भात हस्तांतरण प्रक्रिया सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल अशी माहिती यावेळी देण्यात आली. आरोग्य विभागाच्या नवीन आधुनिक सुविधा युक्त २०० खाटांच्या दवाखान्याची निर्मिती करण्यासाठी जागेच्या उपलब्धता बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. यासंदर्भात एक हेक्टर तात्काळ जागा उपलब्ध करून दिले जाईल तसा प्रस्ताव सादर करा व माहिती उपलब्ध करून द्या मी त्याला ८ दिवसात मंजुरी प्राप्त करून देतो अशी ग्वाही मंत्र्यांनी या वेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here