– शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे प्रवेशोत्सव साजरा
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ०३ : श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली द्वारा संचालीत शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे शैक्षणिक सत्र २०२४ -२५ करीता आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार यांचे हस्ते स्वागत करून पुस्तक वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार होते तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक किशोर कोल्हे, प्रा.विजय मेश्राम, जेष्ठ जेष्ठ शिक्षिका संघमित्रा कांबळे, उद्धव वाघाडे हे होते .
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्याची शाळेविषयी उत्सुकता वाढावी यासाठी शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथील सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग तत्पर व प्रयत्नशील राहतील असे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले .
कार्यक्रमाचे संचालन विद्यालयातील क्रीडा शिक्षक बी.आर.सोरते यांनी केले तर आभार एन.व्ही.गेडाम यांनी मानले..
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील बहुसंख्येने विद्यार्थी व शिक्षक सी.एन.नरुले, पी.बी.मुंगनकर, एन.एस.कोहाडे, एल.बी.कोडापे, आर.जी.पराते, एम.ए.नवघडे, सोनिका वैद्य, प्राध्यापक के.पी.सोरते, एम.एस.सराटे, आर.जे.भोयर, जी.एम.शेंडे, एस.एस.खेवले, पूर्णवेळ शिक्षक विवेक गलबले, आर,जी. मानागडे, एम.एम.राउत, ओ.एन.कुथे, एम.एम.उरकुडे, कु.एस.के.वाट, कु.डी.बी.भानारकर, जेष्ठ लिपिक अनिल बांबोळे, शिवा भोयर, घनश्याम भोयर उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #kurkheda )