तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात खरमतटोला येथील विद्यार्थिनींचे यश

133

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात खरमतटोला येथील विद्यार्थिनींचे यश
– दिव्यांग गटात सौ. जे. बी. चंदेल कला कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक
The गडविश्व
कुरखेडा, दि.०२ : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सौ. जे. बी. चंदेल कला कनिष्ठ महाविद्यालय, खरमतटोला येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत दिव्यांग गटात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हे विज्ञान प्रदर्शन दिनांक २९ ते ३० डिसेंबर दरम्यान शासकीय आश्रमशाळा, येंगलखेडा येथे आयोजित करण्यात आले होते.
या प्रदर्शनात बारावी वर्गातील ज्ञानेश्वरी नैताम व स्नेहा लोणारे यांनी प्रभावी प्रतिकृती सादर करून परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. सदर यश प्राचार्य उमाताई चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी मिळविले असून, त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे हे फलित मानले जात आहे.
दरवर्षीप्रमाणे याही शैक्षणिक सत्रात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व सहशैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
या यशाबद्दल आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ, कुरखेडा यांचे सचिव जयेंद्रसिंह चंदेल, संस्थेच्या अध्यक्षा जानकीबाई चंदेल तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य उमाताई चंदेल यांनी सहभागी विद्यार्थिनींचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सौ. जे. बी. चंदेल महाविद्यालयातील सर्व कर्मचारीवर्ग व मार्गदर्शक शिक्षिकांनीही विद्यार्थिनींचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here