– मेंढा ग्रापंतर्फे दारूविक्रेत्यांना नोटीस
The गडविश्व
गडचिरोली,७ फेब्रुवारी : तालुक्यातील मेंढा गावातील नऊ अवैध दारूविक्रेत्यांना मुक्तिपथ गाव संघटनेच्या मागणीनुसार ग्रामपंचायत समितीच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात आले. सोबतच दारूविक्रीचा अवैध व्यवसाय बंद न केल्यास प्रशासकीय कारवाईसह दंड देखील वसूल करण्याचा इशाराही देण्यात आला.
मेंढा गावात मुक्तिपथ गाव संघटनेच्या अथक प्रयत्नांतून अवैध दारूविक्री बंद करण्यात आली होती. मात्र, हळूहळू काही विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय पुन्हा सुरु केला. बघता-बघता गावातील विक्रेत्यांची संख्या नऊ एवढी झाली. गावातील अवैध दारूविक्री पुन्हा बंद करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेच्या मागणीनुसार ग्रामपंचायत समिती व गाव संघटनेच्या सदस्यांची बैठक पार पडली. यावेळी दारूविक्री थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गावातील नऊ विक्रेत्यांना नोटीस बजावून अवैध व्यवसाय बंद करण्याची सूचना देण्यात आली. सोबतच नोटीसला न जुमानता अवैध व्यवसाय सुरूच ठेवल्यास प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला. यावेळी सरपंच वैशाली चचाणे, पोलिस पाटील प्रमोद साखरे, ग्रामपंचायत सदस्य अचित ठाकूर, ग्रामसेवक स्नेहलता बोरकर, माजी तंमुस अध्यक्ष रवींद्र भुरले, प्रतिष्टीत व्यक्ती शामराव भुरले, मुक्तिपथ संघटक अमोल वाकुडकर उपस्थित होते.
(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Bard AI) (Aaron Finch) (Hogwarts Legacy) (Victoria Gowri) (Ravi Shastri) (Chelsea) (PSG) vs Toulouse)