The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०३ : तालुक्यातील गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या निमगाव येथील गणेश अलंकार विद्यालय आरोग्य शिबिर घेण्यात आले व विशेष करून किशोरवयीन मुलींकरिता कुर्मा प्रथा या विषयावर सखोल मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थ्यांची मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली.
एस.टि.एल.मोबाईल सेवा मोबच्या वतीने निमगाव येथील गणेश अलंकार विद्यालय व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगाव येथे एक दिवसाचे आरोग्य शिबिर घेण्यात आले.
सदर शिबीर मधे किशोरवयीन मुलींची तपासणी करण्यात आली. किशोर वयात होणारे शारिरीकझ मानसिक, सामाजिक बदल या विषयावर माहिती देण्यात आली. ग्रामीण भागातील समाजात असलेल्या कुर्मा प्रथा आरोग्यासाठी कशा घातक आहेत. या बद्दल माहिती देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येवून औषधौपचार करण्यात आले. स्वताच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची सुचेना करण्यात आली.
तपासणी चमूत डॉ शृंखला डोंगरे, निर्मला भोयर (सिस्टर), नानाजी मेश्राम (ऑप्टोमेट्रिस्ट), प्रियांका वड्डे (सिस्टर), हर्षल चिलबुले (समन्वयक) यांनी केले.
