चिमूर : शेतशिवारात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत इसमाचा मृतदेह आढळला

100

– तीन दिवसांपासून होते बेपत्ता; मृताच्या तोंडाला बांधलेला होता रुमाल
The गडविश्व
ता. प्र/चिमूर, दि. २८ : तालुक्यातील अडेगाव ते बाम्हणी-चिमूर मार्गालगतच्या नंदारा गावाजवळील शेतशिवारात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका इसमाचा मृतदेह बुधवारी (२८ ऑक्टोबर) सकाळी आढळून आला. प्रभाकर भोयर (५०, रा. वडसी, मूळ गाव मालेवाडा) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या तोंडाला रुमाल बांधलेला असल्याचेही समोर आले आहे.

प्रभाकर भोयर हे मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी त्यांचा विविध ठिकाणी शोध घेतला; मात्र ते सापडले नव्हते. दरम्यान, नंदारा गावाजवळील शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

माहिती मिळताच चिमूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. प्रभाकर भोयर यांच्या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, चिमूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chimurnews #crimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here