राज्य सरकारचे खातेवाटप जाहीर ; कोणाला कोणते खाते ?

1293

The गडविश्व
मुंबई, १४ जुलै : राज्य सरकारमध्ये नव्यानेच दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्री पद मिळाले मात्र खातेवाटप होणे बाकी होते. आता मात्र हा तिढा सुटला असून खातेवाटप जाहीर झाले आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. तर या मंत्रीमंडळात पहिल्यांदाच महिलेला स्थान मिळाले आहे.

पक्षानुसार खातेवाटप असे आहे…

शिवसेना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग

गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी दगडू भुसे – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय दुलिचंद राठोड – मृद व जलसंधारण
संदीपान आसाराम भुमरे – रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रविंद्र सामंत – उद्योग
प्रा.तानाजी जयवंत सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक वसंतराव केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा
शंभूराज शिवाजीराव देसाई – राज्य उत्पादन शुल्क

भाजप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता

राष्ट्रवादी

उपमुख्यमंत्री अजित पवार – वित्त व नियोजन
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
धनंजय पंडितराव मुंडे – कृषि
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here