– उमेदवारांना दिलासा
The गडविश्व
गडचिरोली, १४ जुलै : तलाठी पदभरती २०२३ करिता उमेदवारांकडे पेसा क्षेत्रातील रहिवासी प्रमाणपत्र नसल्यास शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, स्वयंघोषणापत्र अपलोड करता येईल असे पुणे अपर जमावबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य ) आंनद रायते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. यामुळे आता उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
पेसा प्रमाणपत्राकरिता उमेदवारांची मोठया प्रमाणात धावपळ होत होती, अर्ज भरतांना पेसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने उमेदवार शासकीय कार्यालयाच्या चकरा मारतांना दिसुन येत होते. मात्र सदर पेसा प्रमाणपत्राकरिता विलंब होत असल्याने उमेदवार पदभरतीपासून वंचित राहण्याची शक्यता बळावली होती. त्यामुळे आता सदर पदभरतीकरिता ऑनलाईन संकेतस्थळावर उमेदवाराने पेसा क्षेत्रामध्ये अर्ज भरतांना पेसा क्षेत्रातील रहिवासी पुरावा अपलोड करा या ठिकाणी कागदपत्र अपलोड करतांना उमेदवाराकडे पेसा क्षेत्रातील रहिवासी प्रमाणपत्र नसल्यास त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, स्वयंघोषणापत्र अपलोड करता येणार आहे. तर उमेदवारांची अंतीम निवड झाल्यानंतर कागपत्र पडताळणी वेळी पेसा क्षेत्रातील रहिवासी असल्याबाबतचे प्रमाणपत्र उमेदवारास सादर करणे बंधनकारक राहणार आहे याची नोंद घ्यावी असेही कळविले आहे.
PESA Declaration
पेसा क्षेत्रातील रहिवासी पमाणपत्र अपलोड करण्याबाबत : आता 'हे' प्रमाणपत्र, कागदपत्र करता येईल अपलोड#PESADeclaration #talathibharti2023 #तलाठीभरती2023@MahaDGIPR @InfoGadchiroli @InfoChandrapur pic.twitter.com/EAQkCu1o2W
— THE GADVISHVA (@gadvishva) July 14, 2023
(the gadvishva, gadchiroli, the gdv, pesa, talathi bharti 2023, Maaveeran, Tesla, NASA, CUET PG Answer Key 2023, The Summer I Turned Pretty, Chandrayaan-3 Launch date, Yamuna water level, India Women vs Bangladesh Women )