आमदार डॉ. देवराव होळी यांची ओबीसी मंत्री ना.अतुल सावे यांच्याकडे मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : राज्य सरकारने ओबीसी बांधवांसाठी वस्तीगृह मंजूर केले असून वस्तीगृहांचे उद्घाटन व लोकार्पण केले आहे मात्र प्रवेश प्रक्रिया अजून पर्यंत सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे ओबीसी वस्तीगृहाकरिता प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी व एनटी प्रवर्गातील लाभार्थ्यांना देण्यात येणारे यशवंतराव चव्हाण घरकुलांच्या प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहेत त्यामुळे त्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी बहुजन मागासवर्गीय मंत्री अतुल सावे यांच्याकडे मुंबई मंत्रालयात भेट घेऊन केली.