-एससी-एसटी आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती यांची माहिती
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती गडचिरोली च्या वतीने उद्या २१ ऑगष्ट २०२४ ला गडचिरोली जिल्हा बंद चे आवाहन करण्यात आले आहे. उद्या गडचिरोली शहर कडकडीत बंद ठेवण्यात येणार असुन धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
अनु.जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरण व क्रिमिलेअर बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तात्काळ रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने संसदिय कायदा पारित करावा, आरक्षणाचे अ,ब,क,ड गट पाडण्यात येवू नये, कारण ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमाने विविध जातीतील लोकांना एकत्र आणून गुलामी नष्ट केली परंतु या निर्णयाने फूट पाडून पुन्हा गुलामित टाकण्याचा प्रयत्न होत आहे. गडचिरोली बंद मधे सर्व अनु. जाती जमातीच्या नागरिकांनी तसेच संघटना व विविध गटांनी गडचिरोली बंद ला सहकार्य करण्याचे आवाहन या पत्रकार परिषदेतून करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला प्रा. मुनिश्वर बोरकर, प्रा भाष्कर मेश्राम, ॲड. राम मेश्राम, कुणाल कोवे, मिलिंद बाबोंळे, मंदिप गोरडवार, नरेश महाडोरे, सुरेश कन्नमवार, तुळशीराम सहारे,उमेश उईके, विद्या कांबळे, रेखा कुंभारे, अरविंद वाळके, मालती पुडो, वनिता पदा यांचेसह अनेक एससी-एसटी आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती चे कार्यकर्ते उपस्थित होते.