वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया यंदाच्या सत्रापासून सुरू करा

65

– वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे आमदार डॉ. देवराव होळी यांची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : आपण अथक प्रयत्नातून गडचिरोली जिल्ह्याला शासकीय महाविद्यालय मिळवून दिले असून याच सत्रापासून प्रवेश प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी सतत प्रयत्न करीत आहे परंतु काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे अजूनही प्रवेश प्रक्रिया संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे या संदर्भातील असणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून यंदाच्या सत्रातून प्रवेश प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसनजी मुश्रीफ यांच्याकडे मुंबई मंत्रालयात भेट घेऊन केली.
याप्रसंगी लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी याच सत्रापासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत व त्यातील असणाऱ्य तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत संबंधितांना निर्देशित केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here