कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात विशेष आरोग्य शिबीर : ५७७ रुग्णांची तपासणी व औषधोपचार

117

The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २२ : स्वस्थ नारी–सशक्त परिवार अभियान तसेच सेवा पंधरवाडा अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे आयोजित विशेष आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात परिसरातील विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या तब्बल ५७७ रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. यामध्ये २९५ महिला व २८२ पुरुष रुग्णांचा समावेश होता.
शिबिराचे उद्घाटन रुग्ण कल्याण समिती सदस्य सौ. आशाताई बानबले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष व रुग्ण कल्याण समिती सदस्य सिराज पठाण होते. प्रमुख अतिथी म्हणून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित ठमके, वैद्यकीय अधिकारी डॉ. कमलेश परसवानी, डॉ. चकोले, डॉ. तडफदार, डॉ. साठवणे, डॉ. जगदीश बोरकर, तसेच मुख्य अधिपरिचारिका पुष्पलता खवड आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात अस्थिरोग, शल्यक्रिया, स्त्रीरोग, बालरोग, दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा, कान-नाक-घसा, किशोरवयीन मुलींची तपासणी यासह कुपोषण, सिकलसेल, कर्करोग, असंसर्गजन्य व लैंगिक आजार आदींची तपासणी व उपचार करण्यात आले. यावेळी आभा कार्ड, सिकलसेल ग्रस्त कार्ड वाटप करण्यात आले तसेच कुष्ठरोग कीटही रुग्णांना देण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मच्छिंद्र उईके यांनी केले तर आभारप्रदर्शन मुख्य अधिपरिचारिका सौ. पुष्पलता खवड यांनी मानले.
#thegadvishva #thegdv #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here