गडचिरोलीची सकारात्मक ओळख जगासमोर नेण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुन्सर्सचा पुढाकार

77

गडचिरोलीची सकारात्मक ओळख जगासमोर नेण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुन्सर्सचा पुढाकार
– शासन–डिजिटल माध्यमांमध्ये समन्वय वाढविण्यावर भर; ‘अनटॅप्प्ड गडचिरोली’ संकल्पनेला चालना
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामे, लोककल्याणकारी योजना आणि विविध सकारात्मक बदलांची माहिती अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयात बुधवारी सोशल मीडिया इन्फ्लुन्सर्ससोबत संवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. शासन आणि डिजिटल माध्यमांमध्ये अधिक सशक्त समन्वय निर्माण करून गडचिरोलीची सकारात्मक व विकासाभिमुख ओळख राज्य तसेच देशपातळीवर पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी उपस्थित इन्फ्लुन्सर्सशी संवाद साधताना शासनाच्या विकासकामांची, लोककल्याणकारी योजनांची आणि जिल्ह्यातील विविध सकारात्मक उपक्रमांची माहिती वस्तुनिष्ठ, विश्वासार्ह आणि प्रभावी पद्धतीने समाजमाध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. जिल्ह्याच्या विकासात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम असून त्याचा जबाबदारीने वापर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.बैठकीत जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, कृषी, उद्योग तसेच आदिवासी विकास क्षेत्रातील उपक्रमांचा प्रभावी प्रचार-प्रसार करण्यासाठी सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करण्यात आले. तसेच माहिती प्रसारित करण्यापूर्वी तथ्य पडताळणी करणे, अप्रमाणित किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून दूर राहणे आणि समाजात सकारात्मक संदेश पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात आला.
‘अनटॅप्प्ड गडचिरोली’ या संकल्पनेअंतर्गत जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा, जैवविविधता आणि स्थानिक संस्कृतीचा प्रभावी प्रचार-प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्याचे ठरले. याशिवाय स्थानिक दर्जेदार डिजिटल आशय निर्मितीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी विविध शासकीय जनजागृती मोहिमा आणि जाहिरातींद्वारे सोशल मीडिया इन्फ्लुन्सर्सना आर्थिक व इतर अनुषंगिक सहकार्य करण्याच्या शक्यतांवरही सकारात्मक चर्चा झाली.
बैठकीत सहभागी इन्फ्लुन्सर्सनी विविध विधायक सूचना मांडत जिल्ह्याच्या विकासात्मक वाटचालीत सक्रिय योगदान देण्याची तयारी दर्शविली. भविष्यात प्रशासन आणि सोशल मीडिया निर्माते यांच्यात अधिक प्रभावी समन्वय साधून गडचिरोलीची सकारात्मक प्रतिमा अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी संयुक्तपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी प्राची सातपुते, राहुल रोहनकर, पंकज नंदगिरीवार, विवेक मेटे, मोहित मसराम, हितेश वाघाडे, मंगेश मेश्राम, स्वेतेश मडावी, शुभम पारवेकर, अभिषेक गंडाटे, साक्षी उईके, प्रणय भजभुजे, सौरभ भांडेकर, आचल मडावी, निर्जल उराडे, अनेक सडमेक यांच्यासह जिल्ह्यातील अनेक सोशल मीडिया इन्फ्लुन्सर्स उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #Gadchiroli #SocialMedia #Influencers #DigitalMedia #PositiveGadchiroli #UntappedGadchiroli #Maharashtra #GovernmentInitiative #PublicRelations #DigitalCreators #Tourism #TribalDevelopment #Development #GoodGovernance #InformationDepartment #SocialMediaCampaign #LocalNews #TheGadVishwa

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here