धक्कादायक : नक्षल्यांनी पुरून ठेवलेल्या आयईडीच्या स्फोटात दोन चिमुकल्यांचा मृत्यू

2571

– इंद्रावती नदी जवळच्या गावात घडली घटना, परिसरात खळबळ
The गडविश्व
बिजापूर, दि.१३ : जिल्ह्यात बारा नक्षल्यांना कंठस्नान घालण्याची घटना घडल्यानंतर आणखी एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. जिल्ह्यातील इंद्रावती नदीच्या पलीकडील बोडगा गावात मुले खेळत असताना नक्षल्यांनी जमिनीत पुरून ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाल्याने दोन चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाला झाल्याची घटना १३ मे ला उघडकीस आली आहे. सदर घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
नक्षली ह पोलिसांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जमिनीत आयईडी पेरून ठेवतात. अशातच बिजापूर जिल्ह्यातील बोडगा गावातील मुले खेळत असताना अचानक आयईडी चा स्फोट झाला यात दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. घटनेनंतर गावकऱ्यांनी मृतदेह खाटेवर भैरमगड रुग्णालयात नेत असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेला एसपी जितेंद्र यादव यांनी दुजोरा दिला असून दोन निष्पाप मुलांचा या आयईडी सोफ्टात जीव गेल्याने संतापही व्यक्त करण्यात येत आहे.

(#thegdv #thegadvishva #bijapur #cgpolice #cgnews #IEDBlast)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here