– चार मजुरांचा जागीच मृत्यू, सहाजण गंभीर जखमी
The गडविश्व
बुलढाणा, २ ऑक्टोबर : नागपूर – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर (Nagpur-Mumbai National Highway) एका भरधाव ट्रकने झोपलेल्या मजुरांना चिरडल्याची
घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी सकाच्या सुमारास घडला.
बुलढाणा येथील नांदुरा तालुक्यातील वडनेर येथे चिखलदरा येथील काही मजूर रस्त्याच्या कामासाठी इथे आले होते. दरम्यान महामार्गाच्या बाजूला झोपडीत झोपले असताना सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास PB-11/CZ 4047 या आयशर ट्रकने वडणेर भुलजी गावाजवळ झोपलेल्या मजुरांच्या झोपडीला जोरदार धडक दिली. या अपघातात झोपडीत झोपलेले प्रकाश बाबु जांभेकर, पंकज तुळशीराम जांभेकर, अभिषेक रमेश जांभेकर याचां मृत्यू झाला. तर दिपक खोजी बेलसरे, राजा दादु जांभेकर यांच्यावर मलकापूर येथे शासकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी बुलढाणा येथे संपर्क साधून माहिती घेतली. तसेच अपघातग्रस्तांना मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.