धक्कादायक : वीज कोसळून अख्खे कुटूंबच ठार

7835

– वडसा-कुरखेडा मार्गावरील घटना
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, २४ एप्रिल : वीज कोसळून अख्खे कुटूंबच ठार झाल्याची धक्कादायक घटना वडसा-कुरखेडा मार्गावरील दुग्ध डेअरी (तुळशी फाटा) जवळ सोमवार २४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेने जिल्ह्यात एकचं खळबळ उडाली आहे.
भारत लक्ष्मण राजगडे (३२) संगीतकार रा. आमगांव ता. देसाईगंज व त्याची पत्नी सौ. अंकिता भारत राजगडे (३०) हे दोघेही पती-पत्नी आपल्या चार वर्षीय देवांशी व दोन वर्षीय मनस्वी सह गरगळा येथुन लग्न लावून येत असताना मार्गातच हलक्या पावसाची सुरुवात होऊन वीज कडाडने सुरू झाले. वीज कडाडत असल्याने राजगडे यांनी दुग्ध डेअरी जवळ एका झाडाच्या खाली आसरा घेतला असता अचानक वीज अंगावर कोसळल्याने राजगडे कुटूंबातील चारही जण जागीच मृत्युमुखी पडले. याबाबत देसाईगंज पोलीसांनी घटनास्थळ गाठून चारही जणांचे शव उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रूग्णालय देसाईगंज येथे पाठविले पुढील तपास पो.नि. रासकर यांचे मार्गदर्शनात सुरु आहे.
सदर घटना हृदय पिळवटून टाकणारी तसेच धक्कादायक असल्याने जिल्हाभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्याला ५ दिवस विजांचा कडकडाट, वादळ वारा व पाऊस असा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे सुद्धा आवाहन करण्यात आलर आहे.

( the gdv) (the gadvishva) (desaiganj gadchiroli news updates) (Shocking: Entire family killed by lightning)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here