देसाईगंज-आरमोरी मार्गावर कारची झाडाला धडक, चिमुकल्याचा मृत्यू

1191

देसाईगंज-आरमोरी मार्गावर कारची झाडाला धडक, चिमुकल्याचा मृत्यू
– तिघेजण जखमी
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, २४ एप्रिल : लग्न आटोपून परतताना भरधाव कारची झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू तर तीन जखमी झाल्याची घटना देसाईगंज- आरमोरी मार्गावरील कासवी फाट्यानजीक २३ एप्रिलला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. दुर्गांश डुंबरे (३) असे अपघातात मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे तर प्रमोद शरद डुंबरे (४०), दीक्षा प्रमोद डुंबरे (३७) मुलगा शिवांश (६) असे जखमींची नावे आहेत.
प्राप्त महितीनुसार, डुंबरे कुटुंब अर्जुनी तालुक्यातील बुद्धेवाडा येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी कार ने गेले होते. दरम्यान लग्न आटोपून परत येत असतांना दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास देसाईगंज- आरमोरी मार्गावरील कासवी फाट्याजवळ कार चालक प्रमोद यांचा कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या झाडावर कार धडकली. अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या अपघातात चौघेही जखमी झाले, त्यांना आरमोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करून दुर्गांशला मृत घोषित केले तर इतर तिघांवर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरू असून गेल्या महिनाभरात अनेक लहान मोठे अपघात झाले आहेत.

(the gdv) (the gadvishva) (armori desaiganj gadchiroli car accident)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here