– ए.जे. फाउंडेशन तर्फे शिबीर
The गडविश्व
गडचिरोली, २४ एप्रिल : ए.जे. फाउंडेशन गडचिरोली तर्फे लहान मुलांना नैसर्गिक वातावरणात मुक्त आनंद देण्यासाठी२१ ते २३ एप्रिल असे तीन दिवशीय १० ते १४ वयोगटातील मुलांसाठी ‘मुक्तानंद’ शिबिराचे आयोजन चौधरी फार्म हाऊस खरपुंडी रोड,दिभना या परिसरात घेण्यात आले होते.
शिबिराच्या अगोदरच्या दिवशी रात्री वादळ, वारा आणि पाऊस पडला होता तरीसुद्धा ५९ पालकांनी आपल्या पाल्यांना शिबिर स्थळी आणून दिले.
शिबिराची सुरुवात योगा आणि श्रमदान करून करण्यात आली. हसत खेळत परिचय, गणितीय खेळ, स्वतःच्या चांगल्या वाईट सवयी, दुर्बिणीच्या साह्याने पक्षी निरीक्षण, शेतशिवारा जवळ असणाऱ्या नदीत वाळूमध्ये मुक्त स्वच्छंद खेळण्या बागळण्याचा मनमुराद आनंद लहान मुलांना अनुभवता आला.संध्याकाळी प्रार्थना दिवसभरातील अनुभव, शिबिराविषयीचे मनोगत घेण्यात आले. रात्री आठ वाजता शेतशिवारातील चुलीवरील साधे जेवण आणि झोपण्यापूर्वी गटचर्चा असे लहान मुलांच्या आवडीचे विषय घेण्यात आले.
रात्री आलेला वादळ, वारा आणि पाऊस याचाही प्रत्यक्ष अनुभव बालकांनी मुक्तपणे घेतला. या वादळवाऱ्यात सावली आणि जेवनासाठी टाकलेला मंडप पालापाचोळ्यासारखा उडून गेला आणि आयोजकांची चिंता वाढली. तरीही दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात योगा,दुसऱ्या सत्रात डॉ. अद्वय अप्पलवार यांचे डोळ्यांची काळजी आणि आहार याविषयी मार्गदर्शन झाले. लगेच प्राची मॅडम पुणे यांनी चित्रकला आणि पेंटिंग यावर कृतीयुक्त सत्र घेतले.
वातावरणाचा रौद्र रुप लक्षात घेऊन शिबिराची घेण्याच्या सूचना देण्यात आल्या तेव्हा मात्र शिबिरातील मुले खूप हळहळली. मुलांना घरी जायचे नव्हते. त्यांना तिन्ही दिवस शेत शिवारातील शिबिराचा मुक्त आनंद लुटायचा होता.
शिबीर यशस्वी करण्यासाठी केदार सर, विक्रम सर वडसा, प्रा.देवानंद दुधे सावली, वाल्मिक सर, सुरज सर, विलास सर वरोरा, विवेकानंद सर चामोर्शी, मनीषा मॅडम, स्वाती मॅडम, प्राची मॅडम पुणे आणि मंगलभाऊ इत्यादींनी खूप अथक परिश्रम घेतले.
(the gdv) (the gadvishva) (gadchiroli)