कुरखेडा : शिक्षकाचा शेतशिवारातील विहिरीत मृतदेह आढळला

1533

– मृतदेह आढळून आल्याने खळबळ
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, २३ एप्रिल : शहराला लागून असलेल्या शेतशिवरात शिक्षकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. संजय टेमसूजी बगमारे (५५) असे मृतक शिक्षकाचे नाव आहे. सदर घटनेने एकच खळबळ उडाली.
प्राप्त माहितीनुसार, बगमारे हे कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक होते. दरम्यान कुरखेडा शहराला लागूनच असलेल्या शेतशिवारातील विहिरीत त्यांचा मृतदेह शेतमालकाला दिसताच याबाबत पोलीसांना कळविले. पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदन करिता पाठीवले.
संजय बगमारे हे हसमुख व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या अशा मृत्यूने गोठणगाव येथील नागरिक तसेच लहान मोठे सर्वच व्याकूळ झाले होते. त्यांच्या पच्यात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. घटनेचा पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहे.

(the gdv the gadvishva kurkheda gadchiroli news update)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here