– सामुहिक विवाह सोहळे हि आजच्या काळाची गरज आहे : आमदार कृष्णा गजबे
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, २३ एप्रिल : माना आदिम जमात मंडळ, मुंबई जिल्हा शाखा गडचिरोली व ग्राम शाखा वाढोणा तालुका कुरखेडा यांच्या वतीने वाढोणा येथे माना जमातीचा सोहळा २३ एप्रिल रोजी संपन्न झाला. या सामूहिक विवाह सोहळ्याला आमदार कृष्णा गजबे यांची उपस्थितीती होती. या सामूहिक विवाह सोहळ्यात १३ जोडपी विवाहबद्ध झाली.
सामुहिक विवाह सोहळ्यात आपल्या उपवर मुला-मुलींचे लग्न लाऊन देणे हा सर्वोत्तम पर्याय तर आहेच परंतु काळाची गरज सुद्धा आहे. लग्न खर्चात अनेक आई वडील कर्जबाजारी होतात हे कुठेतरी थांबायलाच पाहिजे यासाठी सामुहिक विवाह हा सर्वोत्तम पर्याय आहे असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजभे यांनी केले.
सर्वांगसुंदर उप्कृष्ठ सामुहिक विवाह सोहळा आयोजित केल्याबद्दल आमदार कृष्णा गजबे यांनी आयोजक समितीचे मनापासून अभिनंदन केले व नवविवाहित वधू-वरांना भावी आयुष्याकरिता शुभआशीर्वाद दिल्या. यावेळी समाजबांधव उपस्थित होते.