खळबळजनक : वीज कोसळून इसमाचा मृत्यू

1395

– गुरे चारत असतांना मृत्यूने कवटाळले
The गडविश्व
ब्रम्हपुरी, २३ एप्रिल : स्वतःचे म्हशी राखण्याकरिता गेले असता वीज कोसळून इसमाचा मृत्यू झाल्याची घटना २२ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील धानोलीपोहा येथे घडली. नवलाजी बळीजी लडके (अंदाजे वय ४०) असे मृतकाचे नाव आहे.
हवामान विभागाने नागपूर विभागात वादळ, विजांच्या कडकडाटेसह पाऊस पडण्याचा इशारा दिला होता तसेच नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे सुद्धा आवाहन करण्यात आले होते. दरम्यान नवलाजी लडके हे स्वतःचे म्हशी चारण्याकरिता गेले असता सायंकाळ अचानक त्यांच्यावर वीज कोसळली यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पच्छात आई, पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here