सावली : वाघाच्या हल्यात महिला ठार

1626

The गडविश्व
ता.प्र /सावली, २६ एप्रिल : शेतात काम करत असतांना अचानक वाघाने हल्ला करून महिलेस ठार केल्याची घटना तालुक्यातील वाघोली बुटी येथे बुधवारी ५ वाजताच्या सुमारास घडली. ममता हरिचंद्र बोदलकर (७०) रा. वाघोली बुटी असे मृतक महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील वाघोली बुटी येथील महिला ममता बोदलकर ह्या शेतात काम करण्यास गेल्या दरम्यान काम करत असतांना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला करून काही दूरवर फरफटत नेत ठार केल्याचे कळते. सदर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ होत असून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. सदर घटनेची माहिती वनविभाग व पोलीसांना देण्यात आल्याचे कळते.

(the gdv) (the gadvishva) (saoli wagholi buti) (tiger attacak)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here