खळबळजनक : नक्षल्यांच्या हल्ल्यात ११ जवान शहीद

6664

– पोलीस विभागात खळबळ, चकमक सुरू
The गडविश्व
दंतेवाडा, २६ एप्रिल : छत्तीसगडच्या दंतेवाडा मध्ये नक्षल्यांच्या हल्ल्यात ११ जवान शहीद झाल्याची खळबळजनक माहिती पुढे येत आहे. यात हल्ल्यात शहिद झालेल्यांमध्ये १० डीआरजी ( DRG) जवान आणि एका ड्रायव्हरचा समावेश झाला आहे.
दंतेवाडाच्या अरनपूरमध्ये नक्षल्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला यात हे जवान शहीद झाल्याचे कळते तर नक्षल आणि पोलिसांमध्ये चकमक सुरू असल्याचीही माहिती पुढे येत आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, सदर घटना अत्यंत दुःखद आहे. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. ही लढत अंतिम टप्प्यात आहे. नक्षल्यांना सोडले जाणार नाही.
सदर घटनेने मात्र परिसरात खळबळ उडाली असून या घटनेचे शोक व्यक्त करण्यात येत आहे.

(the gdv, the gadvishva, naxal police, dantewada, Sensational: 11 jawans martyred in Naxal attack)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here