लाच स्विकारताना ग्रामविकास अधिकाऱ्यासह सरपंच एसीबीच्या जाळ्यात

1999

– ग्रामपंचायत कार्यालयात लाच स्विकारताना अटक
The गडविश्व
ठाणे, २७ जून : केलेल्या कामाचे बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून ग्रामविकास अधिकारी दिलीप गोविंद इंगळे (५१) व सरपंचा कु.रुचिता भालचंद्र पिंगळे (२६) यांनी लाचेची मागणी करून ग्रामपंचायत कार्यालयात स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २७ जून रोजी रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांनी ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत गोठेघर हद्दीतील राईस मिल ते चिंतामणी प्लाझा दरम्यान पिण्याच्या पाण्याचे पाईप लाईनचे केलेल्या कामाचे बिल १ लाख २३ हजार १७५ रुपये मंजूर केल्याचा मोबदला म्हणून ग्रामपंचायत गोठेघर ता.शहापूर जि.ठाणे येथील ग्रामविकास अधिकारी दिलीप इंगळे यांनी ५ हजार रुपये तर सरपंचा कु. रुचिता पिंगळे यांनी २३ हजार रुपये लाच रकमेची मागणी केली. सदर लाच रकम तक्रादार यांना देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाप्रवी ठाणे येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवार २७ जून रोजी केलेल्या पडताळणी कारवाईत ग्रामविकास अधिकारी इंगळे यांनी ५०० तर सारपंचा पिंगळे यांनी २० हजार रुपये तक्रादार यांच्याकडे मागणी केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान लाप्रवी ठाणे यांनी सापळा रचून ताडजोडीअंती ग्रामविकास अधिकारी इंगळे यांना ५०० रुपये तर सरपंचा पिंगळे यांना २० हजार रुपये लाच रक्कम स्विकारताना ग्रामपंचायत कार्यालयात गोठेघर येथे २७ जून रोजी दुपारी २ वाजता रंगेहाथ पकडले. सदर कारवाईने ग्रामविकास विभागात एकचं खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलीस स्टेशन शहापूर, ठाणे ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
(the gdv, tahe gadvishva, thane, acb trap)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here