– मुसळधार पावसात जवान घुसले नक्षल्यांच्या मुख्य भागात
The गडविश्व
जगदलपूर, २८ जून : मान्सून सुरू झाला असून या मान्सूनच्या सुरूवातीला छत्तीसगडमध्ये नक्षल्यांविरोधात ‘ऑपरेशन मान्सून’ सुरू केले आहे. अशातच सुकमा पोलिसांना कोंटा एरिया कमिटीचे माओवादी एराबोर आणि भेज्जी पोलीस स्टेशन हद्दीतील मराईगुडा भागात असल्याची माहिती मिळाली असता जवानांचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते. दरम्यान डीआरजी आणि सीआरपीएफच्या जवानांनी नक्षल्यांच्या अड्ड्यावर छापा टाकला असता दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. या चकमकीत दोन लाख रुपये बक्षीस असलेल्या नक्षलीस ठार केले.
सोढी दुला असे मृत नक्षलीचे नाव आहे. या चकमकीत सुमारे २ ते 3 नक्षलीही जखमी झाल्याचा दावा फोर्सने केला आहे. झालेल्या चकमकीनंतर, परिसराची झडती घेतली असता जवानांनी घटनास्थळावरून एक शस्त्र, आयईडी, नक्षली साहित्य, स्फोटके आणि इतर अनेक वस्तू जप्त केल्या. जवनांचे पथक अजूनही जंगलातच असल्याचे सांगण्यात येत आहे.