The गडविश्व
ता. प्र/ वडसा, दि. २७ : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वडसा च्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज २६ जानेवारी २०२५ ला वडसा शाखेतुन पगार होणारे विविध विभागातील कर्मचारी यांचे सापत्निक सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाखेचे शाखाव्यस्थापक एस. एन. मेश्राम होते. सत्कारमूर्ति म्हणून पुरुषोत्तम भागडकर सेवानिवृत्त शिक्षक वडसा, विजय उइके वडसा, लभुवनेश्वर सेलोकर आरमोरी,पांडूरंग नाकाडे वडसा, तसेच सौ. संध्या विजय उईके उपस्थित होते. यावेळी नागरिकांचा शाल श्रीफळ देवून सापत्निक सत्कार करण्यात आला.
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वडसा येथील शाखेचे नियमित ग्राहक असुन सध्या निवृत्ती वेतन घेत आहेत. सत्काराला उत्तर देताना १ जानेवारी २०२५ पासून सेवानिवुत्त कर्मचारी यांचेसाठी लागु केलेल्या सलेरी पैकेज सुविधांसाठी आभार मानले. तसेच गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाचा बदल समाधान व्यक्त केले. कर्मचारी यांचे वर्तन आपुलकीचे असल्याने बँक सन्मान जनक वागणूक देत असल्याने बँकेविषयी आपुलकी वाटत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन पवन पुनप्रेडडीवार यांनी केले. प्रास्तविक सुधिर दुपारे
आभार शाखेच्या उपशाखाव्यवस्थापिका सौ. सारिका भोयर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखेचे कर्मचारी गोकुल खेडकर, सचिन वाकडे, जगदीश दडमल, लाडसे, विट्ठल उईके, मनोज नंदरधने, सौ. सुजाता दोनाडकर, कु. वैशाली किरसान सहकार्य केले.
