The गडविश्व
ता. प्र/ भामरागड, दि. २७ : पोलीस स्टेशन ताडगाव येथे ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्याने राष्ट्रीय ध्वजारोहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. करण सिंह असिस्टेंट कमांडंट सिआरपीएफ यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला पोलीस स्टेशन ताडगाव च प्रभारी अधिकारी प्रशांत सतेज डगवार सा. यांनी प्रजासत्ताक दिनाचे शुभेच्छा दिल्या व शालेय विद्याथ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व पटवुन सांगितले. तसेच शासनाच्या विविध उपक्रम व प्रशिक्षणा विषयों माहिती देवून नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्याने शासकीय आश्रम शाळा व जि.प.शाळा ताडगाव येवोन्न १० डॉन्स ग्रुप ने देशभक्तीपर गितांवर डॉन्सचे उत्कृष्टंरित्या सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेल्या डॉन्समुळे वातावरण देशभक्तीमय होऊन गेले. विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेल्या प्रत्येक डॉन्सला पोस्टें ताडगांव यांचे वतीने रोख पारितोषीक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. उपस्थितांना चाय, नास्ता व मिठाईच वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मपोअं प्रियंका सातपुते व मपोअं स्नेहा डोंग यांनी तर आभार पोउपनि रणजित मस्के सा यांनी मानले.
सदर कार्यक्रमाकरीता प्रभारी अधिकारी प्रशांत सतेज डगवार सा, पोउपनि रणजित मस्के सा, पोउपनि संगम गायकवाड सा., एसआरपीएफ चे पोनि दराडे सा, लालसु आत्राम माजी पं.स. भामरागड, डॉ. साटमवार, डॉ. विश्वास मॅडम प्राथ. आरोग्य केंद्र ताडगाव रामटेके, मुख्याध्यापक आ.शाळा. ताडगांव, जिल्हा पोलीस अंमलदार एसआरपीएफ व सीआरपीएफ अंमलदार तसेच शासकीय आश्रम शाळा ताडगांव येथील विद्यार्थी व शिक्षकवृंद, व ताडगांव येथील प्रतिष्ठीत नागरिक व महिला उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्याकरिता प्रभारी अधिकारी प्रशांत डगवार सा. यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टेतील अधिकारी / अंमलदार तसेच एसआरपीएफ चे अधिकारी / अंमलदार यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला.
