– घरकुलाची रक्कम जमा करण्यासाठी मागितली लाच
The गडविश्व
ता. प्र / चिमूर, दि. १९ : घरकुल योजनेमधून मिळणारी तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील रक्कम जमा करण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाच रकमेची मागणी करून स्वीकारल्याने पंचायत समिती चिमूर जि. चंद्रपूर येथील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, (कंत्राटी) मिलींद मधुकर वाढई (वय २७) व खासगी इसम आशिष कुशाब पेंदाम (वय २८) व्यवसाय मिस्त्रीकाम रा.देवरी, ता. चिमुर जि. चंद्रपुर (खाजगी ईसम) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई बुधवार १९ जून २०१४ रोजी करण्यात आली. सदर कारवाईने पंचायत समिती विभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारकर्ता हे चिमूर तालुक्यातील रहीवासी असुन रोजमजुरीचे काम करतात. तकारकर्ता यांचे नावे शबरी आवास योजनेअंतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता घरकुल मंजुर झाले होते. सदर घरकुल बांधाकामाकरीता तकारकर्ता यास चार टप्प्यात बांधकामानुसार रक्कम जमा होणार होती. तकारकर्ता यास घरकुल योजनेचे दोन किस्त ६५,००० हजार रुपये जमा झाले मात्र तिसरा टप्पा ४५००० हजार रुपये व चौथ्या टण्याने २०,००० हजार रुपये असे एकुण जमा करून देण्याकरिता अभियंता वाढई यांनी तक्रारदारास २०,००० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांची लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय चंद्रपुर येथे तक्रार दखल केली. प्राप्त तकारीवरून बुधवार १९ जून २०२४ रोजी केलेल्या पळताळणी कार्यवाही मध्ये अभियंता वाढई यांनी तक्रारदारास लाचेची मागणी करून तडजोडीअंती १० हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केल्याचे दिसुन आले. तसेच पडताळणी कार्यवाही दरम्यान अभियंता वाढई याचे सोबत असलेले त्यांचे मित्र आशिष कुशाव पेंदाम याने वाढई यास लाच रक्कम देण्याकरिता तक्रारदारास प्रोत्साहित केले. दरम्यान सापळा कार्यवाही केली असता अभियंता वाढई यांनी स्वतः लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले तसेच त्याचा मित्र आशिष कुशाव पेंदाम यालाही ताब्यात घेवुन पुढील तपास कार्य सुरु आहे. सदर कारवाईने पंचायत समितीसह चिमूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सदर कार्यवाही राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर, संजय पुरदरे, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक, श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि.जितेंद्र गुरनुले, पोहवा संदेश वाघमारे, पो.अ. वैभव गाडगे, राकेश जांभुळकर व चालक पो.अं. सतिश सिडाम ला.प्र.वि. चंद्रपुर यांनी यशस्वी पार पाडली आहे.
(#thegdv #thegadvishva #chandrpuenews #acbtrapd #chimurnews #crimenews)