मुरुमगाव येथे कृषी मेळावा संपन्न

213

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २० : तालुक्यातील मुरुमगाव येथे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने व पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक देशमुख, चिंता अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा सुहास शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मुरुमगाव यांच्या वतीने दादालोरा खिडकीच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना कम्युनिटी पोलिसींगच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात सदर उपक्रम हे नागरिकापर्यंत पोहोचावेत व शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी समृध्दी योजने अंतर्गत १८ जून रोजी भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवप्रसाद गवर्णा, सरपंच , ग्रा. पं. मुरूमगाव, कार्यक्रमाचे उद्घाटक भूपेंद्र शहा मडावी महाराज प्रतिष्ठित नागरिक, मुरूमगाव ) तसेच अजमन रावते माजी सभापती, लताताई पुंगाटे, शेवंता हलामी सरपंच पन्नेमारा, डॉ. राहुल बंसोड, ओम देशमुख होते. प्रमुख मार्गदर्शक धानोराच्या कृषी अधिकारी सौ. दुर्गाताई उसेंडी या होत्या. तसेच प्रमुख पाहुणे SRPF चे पोनी वायफळकर, सीआरपीएफचे कमांडंट प्रेमचंद तसेच पोलिस स्टेशन हद्दीतील गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व पोलिस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कृषी मेळाव्याची सुरुवात भगवान बीरसा मुंडा, विर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कृषी मेळाव्याचे प्रस्ताविक मध्ये दुय्यम प्रभारी अधिकारी सचिन ठेंग यांनी कृषी मेळावा घेण्याचा उद्देश तसेच नीलोत्पल पोलिस अधीक्षक यांनी ‘प्रोजेक्ट उडान’ सर्वकष सक्षमीकरण हा अभिनव प्रयोग सुरू केला असून प्रोजेक्ट उडानमार्फत शिक्षण,आरोग्य, रोजगार कौशल्य, क्रीडा स्पर्धा यावर भर देण्यात येत आहे याबाबत माहिती देऊन विविध प्रशिक्षण व उपक्रम या बाबतची माहिती देण्यात आली. मेळाव्यामध्ये उपस्थित नागरिकांना २५ % अनुदानावर बी – बियाणे व खत यांचे वाटप करण्यात आहे. त्यामधे धान बियाणे 1010 – प्रत्येकी 25 किलो, 1 बॅग याप्रमाणे 75 शेतकरी , 75 बॅग, धान बियाणे -जय श्री राम प्रत्येकी 10 किलो 01 बॅग याप्रमाणे 30 शेतकरी – प्रत्येकी 2 बॅग एकूण 60 बॅग देण्यात आले. तसेच युरिया खत :-
35 बॅग, कृषी देव खत 35 बॅग, विको खत 25 बॅग, तसेच गरजू शेतकऱ्यांना घमेले -20, फावडे -20 वाटप करण्यात आले.
सदर कृषी मेळावा मध्ये शेतकऱ्यांना चिंचे चे रोपे – 20, सीताफळ चे रोपे -20 वाटप करण्यात आले. यावेळी आभा कार्ड – 35, आयुष्मान भारत कार्ड – 25, ऑनलाईन 7/12-10 असे कागदपत्रेही वाटप करण्यात आले.
कृषी मेळाव्या करिता पोस्टे मुरूमगाव गावातील तसेच हद्दीतील 180 ते 200 महिला पुरुष उपस्थित होते. सर्व नागरिकांकरिता उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था करून कार्यक्रमाची सांगता झाली. मेळावा शांततेत पार पाडण्याकरिता जिल्हा पोलीस अधिकारी व अमलदार एस आर पी एफ अधिकारी व अमलदार तसेच पोलिस पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #murumgao #krushimelava)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here