The गडविश्व
गडचिरोली, १३ डिसेंबर : AIREA नवीकरणीय ऊर्जा प्रणालींचा जलद अवलंब करण्यासाठी आणि देशभरात RE प्रक्रिया सुलभ करण्यासाठी कार्य करत असून AIREA च्या गडचिरोली जिल्हा संचालकपदी प्रणित ढोंगे यांची निवड करण्यात आली आहे . AIREA (ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशन) जिल्हा संचालकांचा समावेश कार्यक्रम नुकताच ८ डिसेंबर रोजी गांधीनगर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ढोंगे यांची निवड करण्यात आली.
AIREA नियमितपणे राज्य आणि केंद्रीय मंत्रालयांशी संवाद साधते आणि विविध RE योजनांच्या ग्राउंड लेव्हल अंमलबजावणीसाठी मौल्यवान इनपुट प्रदान करते. AIREA ने ३० जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सौर रूफ टॉप सबसिडीसाठी राष्ट्रीय पोर्टल सुरू करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. AIREA ही GCRT फेज 2 निवासी सौर अनुदान कार्यक्रमाच्या जलद अंमलबजावणीसाठी MSEDCL च्या संयुक्त समितीचे सदस्य आहे.
AIREA चे सर्व निवडून आलेले जिल्हा संचालक RE बंधुत्वाशी तसेच त्यांच्या विभागातील DISCOM अधिकाऱ्यांशी रूफ टॉप सोलर प्रक्रियेतील अडथळे आणि विलंब दूर करण्यासाठी संवाद साधतील. प्रसिद्ध युट्युबर आणि सर्वात मोठ्या सोलर यूट्यूब चॅनेलचे विश्वविक्रम धारक अजित बहादूर यावेळी उपस्थित होते तसेच भारताचे सोलर मॅन डॉ. चेतन सिंग सोलंकी आणि आयआयटीचे प्राध्यापकही उपस्थित होते. साकेत सुरी, पंकज खिरवाडकर, अवतार पटेल, अमित आरोकर आणि अमित देवतळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले ज्याला पहल सोलरचे सहकार्य लाभले.
(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Zika Virus) (Praneet Dhonge has been selected as the District Director of AIREA, Gadchiroli)