जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नवीन अंगणवाडी खोलीचे उद्घाटन संपन्न

311

– छल्लेवाडा येथील बालकांना मिळाले नवीन अंगणवाडी
The गडविश्व
अहेरी, १३ डिसेंबर : तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय रेपनपल्ली अंतर्गत येत असलेल्या छल्लेवाडा येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत नवीन अंगणवाडी खोलीचे बांधकाम पूर्णत्वास आल्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे आता येथील बालकांना नवीन अंगणवाडी इमारत मिळाली आहे.
या नवीन अंगणवाडी खोलीचे उद्घाटन कार्यक्रमाला अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी सभापती सौ.सुरेखा आलाम, माजी जिल्हा परिषद सदस्य, अजय नैताम, राजारामचे सरपंच नागेश कन्नाके, उपसरपंच सौ.सुरक्षाताई आकदर, अँड.एच.के.आकदर, विलास बोरकर, गुलाब देवगडे, शंकर बासरकर, लक्ष्मण झाडे, राहुल सुंदिला, अशोक झाडे, वागू निमगडे, लक्ष्मण जनगाम, मनोहर बासरकर, रवि दुर्गे, वैकुंटम आकुदारी, नागेश ताटिपेली, महेश भगत, हनमंतू ठाकरे, प्रशांत गुरनूले, श्रीनिवास लेंडगुरे, मोंडी कोटरंगे, स्वामी ठाकरे, वसंत चव्हाण, विलास सिडाम, वासुदेव सिडाम, सुरेश ठाकरे, किष्टाया गुरनूले, नारायण कोटरंगे, श्रीहरी गुरजाला, रवि चव्हाण, रवि सोतकु, रजित सभावा, सुरेश चव्हाण आदि परिश्रम घेतले. या मेळाव्याला परिसरातील पुरुष-महिला व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Ajay Kankadalwar)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here