गडचिरोली : चारचाकी वाहनाचा अपघात, एकजण ठार

1118

– एकजण जखमी
The गडविश्व
गडचिरोली, १३ डिसेंबर : दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात चारचाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या खड्डयात उतरल्याने झालेल्या अपघातात चालक ठार त एकचण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास वडसा-आरमोरी मार्गावर घडली. पवन राऊत (२२) रा. मिरची वार्ड , देसाईगंज असे अपघात मृत झालेल्या चालकाचे नाव आहे तर भरत मेश्राम रा. लोहारा असे जखमीचे नाव आहे. तर प्रशांत कावळे हा अपघातात सुखरूप बचावला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक पवन राऊत अणि प्रशांत कावळे हे दोघे दोघे मित्र रविवारी काही कामानिमित्त भंडाराला जायचे असल्याने त्यांनी आरमोरी येथील एका मित्राची झायलो कार मागितली. मात्र परततांना उशीर झाल्याने ती कार स्वत:जवळ ठेवली व सोमवारी सकाळच्या सुमारास मित्राची कार परत करून देण्यासाठी आरमोरी येथे जात असतांना दुचाकीस्वराला वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात घडला. अपघात कार चालक पवन राऊत यांच्या डोक्याला जबर मार लागला. मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाला, यावेळी प्रवास करणाऱ्या एका प्रवासीने कारमधून काढत आरमोरी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले मात्र उपचारा दरम्यान पवनचा मृत्यू झाला.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Road Accident) (Desaiganj) (Gadchiroli) (Armori)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here