पोलीस-नक्षल चकमक : १४ लाख बक्षीस असलेला नक्षली ठार

2295

– चकमकीत आणखी काही नक्षली जखमी झाल्याची शक्यता
The गडविश्व
बालाघाट, २९ सप्टेंबर : जिल्ह्यातील रुपझर पोलीस स्टेशन अंतर्गत कुंडल-कोड्डापर आणि सोनगुडा जंगलात आज सकाळच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत १४ लाख रुपये बक्षिस असलेला नक्षली ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे. कमलू (२५) असे ठार झालेल्या नक्षलीचे नाव असून तो टाडा दर्रेकसा या नक्षलवादी गटाचा सक्रिय सदस्य होता अशी माहिती आहे.
आज सकाळच्या सुमारास SDG बिरसा हॉक फोर्स रुपझर पोलीस स्टेशन अंतर्गत कुंडल-कोड्डापर आणि सोनगुडा जंगलात अभियान राबवित असतांना चकमक उडाली. या चकमकीत १४ लाख रुपये बक्षीस असलेल्या नक्षली कमलू चा खात्मा करण्यात आला. य चकमकीत आणखी काही नक्षली जखमी झाल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. घटनेनंतर परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे असेही कळते.
(the gdv, the gadvishva, balaghat, nakshal, naxal, darrekasa)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here