पुन्हा उडाली पोलीस-नक्षल चकमक ; एक नक्षली ठार

2346

-घटनास्थळावरून शस्त्रे, बीजीएल व मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त
The गडविश्व
सुकमा, दि. ०१ : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज सोमवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत जवानांनी एका नक्षलीचा खात्मा केला आहे. घटनास्थळावर झडती दरम्यान एका नक्षलीचा मृतदेह, शस्त्रे, बीजीएल आणि मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य आढळून आले असता ते जप्त करण्यात आले आल्याचे समजते.
आज सोमवारी डीआरजी आणि कोब्रा 208-204 बटालियनचे जवान शोधमोहीमसाठी निघाले होते. तेव्हा टेतमाडगू भागात आधीच दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने अंधधुंद गोळीबार केले. प्रत्युत्तरादाखल जवानांनीही गोळीबार केला. या चकमकीत एक नक्षली ठार झाला. चकमकीनंतर घटनास्थळाची झडती घेतली असता मृतावस्थेत एका नक्षलीचा मृतदेह आढळून आला. परिसरात सुरक्षा दल शोधमोहीम राबवित असून ते तीव्र करण्यात आली आहे.
दरम्यान छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात शनिवारी रात्री लोहखनिज वाहतूक करणाऱ्या चार ट्रकची नक्षल्यांनी जाळपोळ केल्याची घटना उघडकीस आली होती. लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच नक्षली पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #cgnews #sukma #naxal #firing)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here